Malai For Glowing Skin | पार्लर कशाला? घरची 'साय' करेल कमाल! चेहऱ्यासाठी मलाईचे जबरदस्त फायदे

पुढारी वृत्तसेवा

नैसर्गिक मॉइश्चरायझर: मलाईमध्ये फॅट्सचे प्रमाण जास्त असते, जे त्वचेला आतून ओलावा देऊन कोरडेपणा (Dryness) दूर करण्यास मदत करते.

Skin Care Tips | Canva

मलाई आणि हळद: मलाईमध्ये चिमूटभर हळद मिसळून लावल्याने चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतात आणि त्वचा उजळते.

skin care | Canva

मलाई आणि मध: कोरड्या त्वचेसाठी मलाई आणि मध यांचा पॅक उत्तम आहे; यामुळे त्वचा मऊ बनते.

Skin Care Tips | Canva

मलाई आणि बेसन: बेसन आणि मलाईचा स्क्रब म्हणून वापर केल्यास चेहऱ्यावरील मृत त्वचा (Dead Skin) निघून जाते आणि नैसर्गिक ग्लो येतो.

Skin Care Tips | Canva

अँटी-एजिंग गुणधर्म: मलाईमध्ये प्रथिने आणि जीवनसत्त्वे असतात, जे त्वचेवर अकाली येणाऱ्या सुरकुत्या रोखण्यास मदत करतात.

skin care | Canva

मलाई आणि गुलाब पाणी: उन्हामुळे त्वचा काळवंडली असेल (Tanning), तर मलाई आणि गुलाब पाणी एकत्र करून लावल्याने थंडावा मिळतो.

Canva

त्वचेचा पोत सुधारते: नियमितपणे मलाईने चेहऱ्यावर मसाज केल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि चेहऱ्याचा पोत मऊ होतो.

Monsoon Skincare For Oily Skin | Canva

मलाई आणि लिंबाचा रस: तेलकट त्वचा असलेल्यांनी मलाईमध्ये लिंबाचे काही थेंब टाकून लावल्यास त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते.

Face Pack for Glowing Skin | Canva

उत्तम परिणामांसाठी रात्री झोपण्यापूर्वी किंवा आंघोळीच्या अर्धा तास आधी मलाई लावणे अधिक फायदेशीर ठरते.

skin care | Canva
Pakistani Singer Talha Anjum Engagement Zoya Karim | file photo
<strong>येथे क्लिक करा...</strong>