पुढारी वृत्तसेवा
पाकिस्तानचा प्रसिद्ध गायक आणि रॅपर तल्हा अंजुम लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. त्याने नुकताच आपला साखरपुडा उरकला आहे.
कराचीमध्ये पार पडलेल्या एका खाजगी समारंभात तल्हाने आपली चुलत बहीण आणि डिजिटल क्रिएटर झोया करीम हिच्याशी साखरपुडा केला आणि एकमेकांना अंगठी घातली.
या घरगुती सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
व्हायरल होत असलेल्या फोटोंवरून हे स्पष्ट होत आहे की तल्हाच्या आयुष्यातील नवीन नात्याची सुरुवात झाली असून हे जोडपे एकत्र खूप आनंदी दिसत आहे.
तल्हाची होणारी पत्नी झोया करीम ही लंडनमध्ये राहणारी मेडिकल एस्थेटिशियन आणि कंटेंट क्रिएटर आहे.
ती सोशल मीडियावर सौंदर्य, मेकअप आणि स्टाइलिंगशी संबंधित माहिती शेअर करत असते.
विशेष म्हणजे, झोयाशी नाते जोडण्यापूर्वी तल्हा अभिनेत्री रिम्हा अहमदसोबत रिलेशनशिपमध्ये होता. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली होती, मात्र दोघांनीही यावर कधीच उघडपणे भाष्य केले नाही.
यापूर्वी तल्हाने नेपाळमधील एका कार्यक्रमात भारताचा राष्ट्रध्वज फडकवला होता. त्यानंतर तो चर्चेत आला होता.