Belly Breathing Benefits : फक्त ५ मिनिटांत तणाव गायब! जाणून घ्या 'बेली ब्रीदिंग'ची जादू

पुढारी वृत्तसेवा

बेली ब्रीदिंग म्हणजे छातीऐवजी पोटाचा वापर करून खोल श्वास घेणे. याला विज्ञानात 'डायाफ्रामॅटिक ब्रीदिंग' (Diaphragmatic Breathing) म्हटले जाते.

श्वास घेताना पोट बाहेर फुगणे आणि सोडताना आत जाणे, या प्रक्रियेमुळे शरीरातील मुख्य स्नायू (Diaphragm) सक्रिय होतात आणि ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो.

पोटाने खोल श्वास घेतल्याने शरीरातील 'वेगस नर्व्ह' उत्तेजित होते. मेंदूला शांत होण्याचे संकेत मिळतात आणि ताणतणाव त्वरित कमी होतो.

'जर्नल ऑफ न्यूरोफिजियोलॉजी'मधील संशोधनानुसार, बेली ब्रीदिंगमुळे शरीरातील 'कोर्टिसॉल' या ताण वाढवणाऱ्या संप्रेरकाची पातळी लक्षणीयरीत्या घटते.

'फ्रंटियर्स इन सायकॉलॉजी'च्या अभ्यासानुसार, दररोज ८ ते १० मिनिटे बेली ब्रीदिंग केल्यास एकाग्रता वाढते आणि नकारात्मक विचारांचे प्रमाण कमी होते.

जलद किंवा अर्धवट श्वास घेतल्याने हृदयाची गती वाढते. बेली ब्रीदिंगमुळे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब (Blood Pressure) नॉर्मल होण्यास मदत होते.

बेली ब्रीदिंग कसे करावे? पाठीवर सरळ झोपा किंवा खुर्चीवर बसा. एक हात छातीवर आणि दुसरा हाताच्या पोटावर ठेवा. नाकाने हळूवार आणि खोल श्वास घ्या.

श्वास सोडण्याची योग्य पद्धत : श्वास घेताना पोट फुगले पाहिजे आणि छाती स्थिर राहिली पाहिजे. आता ओठांचा गोल करून हळूहळू तोंडाने श्वास बाहेर सोडा.

सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी दररोज फक्त ५ ते १० मिनिटे बेली ब्रीदिंग करा. यामुळे शांत झोप लागते आणि दिवसभर ताजेतवाने वाटते!

येथे क्‍लिक करा.