Benefit Of Walking : १५ मिनिटे चालण्याचा फायदा काय?
पुढारी वृत्तसेवा
एका नव्या संशोधनानुसार, दररोज केवळ १५ मिनिटे चालणे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
walking | Canva
चालण्याच्या व्यायामावरील नवीन संशोधन 'अॅनल्स ऑफ इंटरनल मेडिसिन'मध्ये प्रकाशित झाले आहे.
33,560 प्रौढांवर आठ वर्षे चाललेला हा अभ्यास असून, सहभागींचे सरासरी वय 62 वर्षे होते .
walking | Canva
संशोधनात ८,००० पेक्षा कमी म्हणजेच शारीरिकदृष्ट्या कमी सक्रिय व्यक्तींचा अभ्यास करण्यात आला.
सहभागींचे पाच मिनिटांपेक्षा कमी ते १५ मिनिटे किंवा त्यापेक्षा जास्त चालणारे असे चार गट करण्यात आले.
पाच मिनिटांपेक्षा कमी चालणाऱ्यांमध्ये मृत्यूदर ४.३६% आढळला, तर १५ मिनिटांहून जास्त चालणाऱ्यांमध्ये तो केवळ ०.८०% आढळला.
Canva
नियमित साधारण ४५ मिनिटांपेक्षा अधिक काळ चालणार्यांमध्ये हृदयविकाराचा झटका किंवा तत्सम आजारांचा धोका खूपच कमी होता.
अभ्यासात म्हटलं आहे की, तुम्ही किती पावले चालता यापेक्षा कशा प्रकारे चालता हे आरोग्याच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे ठरते.
Canva
संशोधकांच्या मते, कोणतेही व्यायाम न करण्यापेक्षा थोडे चालणे नेहमीच आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
येथे क्लिक करा.