पुढारी वृत्तसेवा
साहित्य: छोटा तुकडा बीट, १ चमचा तूप, अर्धा चमचा खोबरेल/बदाम तेल, विटॅमिन E कॅप्सूल
बीट स्वच्छ धुऊन, साल काढून किसून घ्या
किसलेला बीट सुती कापडात/चाळणीत दाबून १-२ चमचे घट्ट रस काढा
लहान वाटीत तूप, खोबरेल तेल, बीटाचा रस एकत्र करा
त्यात विटॅमिन E कॅप्सूल फोडून टाका, मिश्रण ३ मिनिटे फेटून घ्या
हे मिश्रण काचेच्या/ प्लास्टिकच्या स्वच्छ डबीत भरा
डबी २० ते ३० मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवा. बाम घट्ट होईल.
रोज रात्री झोपण्यापूर्वी/दिवसभरात ओठांना हा बाम लावा.
तूप-खोबरेल तेलामुळे ओठांना खोलवर ओलावा
बीटमुळे ओठांचा काळेपणा दूर होऊन नैसर्गिक गुलाबी रंग येतो.