अविनाश सुतार
बियरमध्ये ४ ते ६ टक्के अल्कोहोल असते. त्यामुळे अनेक लोक जास्त प्रमाणात बियर पितात, पण त्यामुळे एकूण अल्कोहोलची मात्राही वाढते
व्हिस्कीमध्ये सुमारे ४० टक्के अल्कोहोल असते. थोडं पिलं तरी त्याचा परिणाम अधिक असतो.बियर कमी ताकदीचे असल्याने जास्त पिणे हानीकारक ठरू शकते
एक पिंट बियरमध्ये १५०-२०० कॅलरीज असतात. बियरमध्ये कर्बोदके आणि साखर अधिक असते, त्यामुळे वारंवार बियर पिणे पोट मोठं करू शकते
३० मि.ली. व्हिस्कीमध्ये फक्त ७० कॅलरीज असतात, आणि त्यात कर्बोदके किंवा साखर नसते. वजन नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून, व्हिस्कीमध्ये कमी कॅलरीज असतात
बियरमध्ये काही पॉलिफिनोल्स असतात. काही संशोधनांच्या मते, हे चांगल्या कोलेस्ट्रॉलला वाढविण्यास मदत करू शकतात
व्हिस्कीमध्ये एल्लाजिक अॅसिड नावाचे अँटीऑक्सिडंट असते, हे सूज आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करतात
अधिक प्रमाणात बियर पिणं यकृतावर खूप दबाव आणते. यामुळे गॅस आणि पोट फुगीचा त्रास होऊ शकतो
व्हिस्कीमध्ये कर्बोदके नसल्यामुळे काही लोकांसाठी ते पचनास सोपे होऊ शकते. पण जर खूप प्रमाणात पिले, तर ते यकृताला हानी पोचवू शकते
एकंदरीत शरीरासाठी अल्कोहोल अजिबात चांगले नाही. उच्च-फॅट असलेल्या अन्नांसोबत मद्यपान करणे अधिक धोकादायक असू शकते
टीप: ही माहिती केवळ मार्गदर्शनासाठी असून ती इंटरनेट स्रोतांवर आधारित आहे. कोणत्याही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञाचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.