Namdev Gharal
हरपी गरुड हा जगातील सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली गरुडांपैकी एक आहे. याचे शास्त्रीय नाव Harpia harpyja असे आहे.
हा गरुड प्रामुख्याने मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील वर्षावनांमध्ये आढळतो.
याचे वैशिट्य म्हणजे मादी ही नरापेक्षा मोठी असतो. तिचे वजन ६ ते न किलो पर्यंत असते तर नराचे वजन ४ ते ५ किलोपर्यंत असते, पंखाचा विस्तार ७ फूटांपर्यंत असतो
मानवापेक्षा दहापट अधिक याची दृष्टी प्रखर असते. त्यामुळे खूप लांबूनही हा आपले सावज सहज हेरु शकतो
हरपी गरुड हा त्याच्या शिकारीच्या कौशल्यासाठी ओळखला जातो. याचे पाय अतिशय दणकट असतात व नखे मजबूत असतात. अस्वलाच्यास नख्यांएवढे याची नखे असू शकतात.
त्याचे मुख्य भक्ष्य माकड आणि स्लॉथ (sloth) आहेत. तिक्ष्ण व मजबूत पकड असल्यामुळे आपल्यापेक्षा अधिक वजनाची शिकार हे सहज करु शकतात.
हरपी गरुडाचे डोके फिकट राखाडी रंगाचे असते, तर पंख आणि पाठीचा भाग गडद राखाडी किंवा काळ्या रंगाचा असतो.
हरपी गरुडाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या डोक्यावर पिसांचा एक मोठा तुरा असतो, जो उत्तेजित झाल्यावर वर येतो त्यामुळे हा पक्षी आणखी रुबाबदार दिसतो.
हा पक्षी जिथे उंच आणि जुनी झाडे असतात. तिथे आपले घरटे बांधतो. आपली घरटी झाडांच्या सर्वात उंच फांद्यांवर बनवतो.