Anirudha Sankpal
लाल शिमला मिरचीत बीटा-कॅरोटीन, ल्युटीन यांसारखे कॅरोटीनोइड्स असतात, जे पेशींचे ऑक्सिडेटिव्ह ताणापासून संरक्षण करतात.
यात व्हिटॅमिन सी भरपूर असते, जे इम्युनिटी मजबूत करते, जखम भरण्यास मदत करते आणि शरीरात लोह (iron) शोषून घेण्यास साहाय्य करते.
लाल शिमला मिरचीत डायटरी फायबर असते, ज्यामुळे बद्धकोष्ठता दूर होऊन पचन संस्था सुरळीत राहते.
ही कमी कॅलरी असलेली भाजी आहे, जी आहारात भरपेट चव आणि भरपूर पोषक घटक देते.
पालक किंवा डाळींसारख्या आयर्नयुक्त पदार्थांसोबत लाल शिमला मिरची खाल्ल्यास शरीरात लोह चांगल्या प्रकारे शोषले जाते.
लाल शिमला मिरचीमधील ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन हे घटक दृष्टी सुधारण्यासाठी आणि डोळ्यांचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत.
यामध्ये कॅलरी आणि सोडिअमचे प्रमाण कमी असून पोटॅशियम व अँटिऑक्सिडंट्स असतात, जे हृदय निरोगी ठेवतात.
लाल शिमला मिरची मधील व्हिटॅमिन सी मुळे कोलेजन निर्मिती होते आणि अँटिऑक्सिडंट्स त्वचेच्या पेशींना डॅमेज होण्यापासून वाचवतात.