प्रेरणादायी...६९व्या वर्षी कॅन्सरवर मात, १०३ व्या वर्षीही धावतायत! दीर्घायुष्याचे रहस्य काय?
पुढारी वृत्तसेवा
वयाच्या १०३ व्या वर्षी माईक फ्रीमॉन्ट एक उत्साही आणि परिपूर्ण आयुष्य जगत आहेत.
वयाच्या ६९ व्या वर्षी कॅन्सर झाल्यानंतर केवळ तीन महिने जगू शकाल, असे माईक यांना सांगण्यात आले हाेते.
मिशिओ कुशी यांच्या 'द कॅन्सर प्रिव्हेन्शन डायट' या पुस्तकातून प्रेरित होऊन त्यांनी वनस्पती-आधारित मॅक्रोबायोटिक आहाराचा स्वीकार केला.
गेली ३१ वर्ष माईक वनस्पती-आधारित आहाराचे पालन करत आहेत.
ब्राऊन राईस, गाजर आणि कोबी यांसारख्या उकडलेल्या भाज्यांचा त्यांनी आपल्या आहारात समावेश केला आहे.
| Photo
माईक प्रक्रिया केलेली साखर, मांस, दुग्धजन्य पदार्थ, पॅक फूड आणि तळलेले पदार्थ टाळतात.
वयाच्या ९८ वर्षांपर्यंत ते आठवड्यातून तीन दिवस १० मैल धावत असत.
आजही माईक फ्रीमॉन्ट सहजपणे पुल-अप्स करतात आणि होडी वल्हवतात.
दररोज रात्री शांतपणे ८-९ तास झोपतात आवश्यक असल्याचे ते सांगतात.
Healthy sleep routine
माईक यांचा विश्वास आहे की, आहारानेच त्यांना बरे केले. त्यामुळे ते निसर्गाशी एकरूप होऊन जीवन जगतात.
आहारातील संयम आणि व्यायामातील सातत्य हीच आपल्या दीर्घायुष्याची किल्ली असल्याचे माईक सांगतात.
येथे क्लिक करा.