Bathing Tips: रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ करणं योग्य की अयोग्य? फायदे काय?

पुढारी वृत्तसेवा

रात्री अंघोळ करावी का?

दिवसभराच्या थकव्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ करणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.

bath

मानसिक ताण होतो कमी

रात्री कोमट पाण्याने अंघोळ केल्यास दिवसभराचा थकवा आणि मानसिक ताण (Stress) क्षणात दूर होतो.

Canva

उत्तम आणि गाढ झोप येते

अंघोळीमुळे शरीराचे तापमान संतुलित होते, ज्यामुळे रात्री नॅचरली खूप गाढ आणि शांत झोप लागते.

Sleep Tips | file photo

त्वचेसाठी वरदान

दिवसभर त्वचेवर जमा झालेली धूळ आणि घाम रात्री अंघोळ केल्याने निघून जातो, ज्यामुळे त्वचा निरोगी राहते.

Skin Care

रक्तभिसरण सुधारते

रात्रीच्या वेळी हलक्या गरम पाण्याने अंघोळ केल्याने शरीरातील रक्तभिसरण (Blood Circulation) वेगाने सुधारते.

blood circulation

स्नायूंना मिळतो आराम

जर तुमचे अंग दुखत असेल किंवा स्नायूंमध्ये कडकपणा असेल, तर रात्रीची अंघोळ स्नायूंना रिलॅक्स करते.

कधी करावी अंघोळ?

लक्षात ठेवा, झोपण्याच्या अगदी लगेच आधी नाही, तर साधारण १ ते २ तास आधी अंघोळ करणे सर्वात योग्य ठरते.

आरोग्यासाठी फायदेशीर!

थोडक्यात सांगायचे तर, रात्री अंघोळ करणे अयोग्य नसून आरोग्यासाठी आणि चांगल्या झोपेसाठी अत्यंत 'योग्य' आहे.

Hair Growth
येथे क्लिक करा...