पुढारी वृत्तसेवा
देशभरातील सुमारे 8 लाख बँक कर्मचारी 28, 29 आणि 30 सप्टेंबरला संपावर जाणार आहेत.
5-डे बँकिंग आणि पेन्शनसह विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.
26 सप्टेंबरला चौथा शनिवार आहे. 27 सप्टेंबरला रविवार आहे. त्यानंतर तीन दिवसांचा संप आहे.
त्यामुळे बँकिंग कामकाजावर सलग पाच दिवस परिणाम होऊ शकतो.
ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी 27 सप्टेंबरला सरकारी बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दिवशी नागरिकांना आवश्यक बँकिंग कामे करता येतील.
भारतीय बँकिंग व्यवस्था देशाच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. दररोज बँकांमधून मोठ्या प्रमाणावर पैशांची देवाणघेवाण होते. रोज १५,००० कोटी ते २०,००० कोटी रुपयांचे धनादेश बँकेत येतात.
UPI हा भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल पेमेंट पर्यायांपैकी एक आहे. दररोज UPI वर मोठ्या प्रमाणात व्यवहार होतात. देशात केवळ UPI द्वारे दररोज सुमारे ८८,००० कोटी ते १ लाख कोटी रुपयांचे व्यवहार होतात.
बँकांमधून RTGS आणि NEFTच्या माध्यमातूनही मोठ्या रकमेचे व्यवहार होतात. कंपन्या, व्यापारी आणि सरकारी यंत्रणा या सेवांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात.
बँक शाखा बंद राहिल्यास रोख रक्कम जमा करणे आणि काढणे अडचणीचे होऊ शकते.
चेक क्लिअरन्सवरही परिणाम होऊ शकतो. व्यापाऱ्यांचे पैसे काही काळ अडकण्याची शक्यता असते.
बँकिंग क्षेत्रातील मोठ्या प्रमाणातील व्यवहारांमध्ये चेकचाही समावेश आहे. संपामुळे काही चेकचे क्लिअरन्स पुढे ढकलले जाऊ शकते.
UPI, ATM, मोबाइल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंग सेवा सामान्यतः सुरू राहतात.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कामकाजावर संपाचा मोठा परिणाम होऊ शकतो.
HDFC Bank, ICICI Bank आणि Axis Bank यांसारख्या खासगी बँका या संपात सहभागी नसतात.