Anirudha Sankpal
मुलांचा हट्टीपणा तोही चार चौघांमध्ये केलेल्या हट्टीपणामुळे अनेक पालक हैराण झाले आहेत.
एखाद्या गोष्टीसाठी सार्वजनिक ठिकाणी आक्रस्ताळेपणा करून आपल्याला जे हवं आहे ते आपल्या पालकांकडून करवून घेण्याचा नवा फंडा या मुलांनी शोधून काढला आहे.
अनेक पालकांची तक्रार असते की जोपर्यंत त्याचा हट्ट पूर्ण केला जात नाही तोपर्यंत तो आमची पाठ सोडत नाही वैतागून त्याचा सर्व मागण्या मान्य कराव्या लागतात.
याच्यावर जाणकारांनी ५ चांगल्या ट्रीक सुचवल्या आहेत. या ट्रीक वापरून मुलांचा हट्टीपणा, आक्रस्ताळेपणा कमी करण्यास मदत होईल.
ज्यावेळी तुमची छोटी मुलं आक्रस्ताळेपणा करतो किंवा तुमची किशोरवयीन मुलं तुमच्यावर ओरडत असतील तर राग येणं स्वाभाविक आहे मात्र तुम्ही शांत रहा शेवटी मुलं तुमच्याकडूनच शिकतात.
तुम्ही जर मुलांवर बॉसगिरी करून त्यांना शांत केलं तर त्यांच्या आत्मविश्वासाला ठेच पोहचू शकते. त्याऐवजी तुम्ही डिटेक्टिव्ह सारखं उत्सुक होऊन माझे मुल असं का करत आहे याचा शोध घ्या.
मुलांच्या अशा आक्रस्ताळेपणाला मानसशास्त्रज्ञ डिफेन्स अशी टर्म वापरतात. वेदनादायी भावनांपासून संरक्षण मिळवण्यासाठी हा मार्ग वापरला जातो.
या भावना मुलांना भाषेच्या स्वरूपात व्यक्त करण्यास मदत करा. त्या भावनेला नाव द्या. यामुळं तुमचा मेंदू शांत होण्यास मदत होते.
मुले शाळा अन् घरातील दुसऱ्यांच्या वागणुकीचे अनुकरण करतात. जर तुमची मुले सतत चुकीचं वागत असतील तर तुम्ही तुमच्या वर्तनाबाबत देखील थोडं अंतर्मुख होणं गरजेचं आहे.
सततचा तणाव मुलांच्या मनावर परिणाम करतो. हा तणाव मुलांच्या नर्व्ह सिस्टम हलवून टाकतो. यामुळं त्यांना त्यांच्या भावना नियंत्रित करणे अवघड जाते.