Banana Tree: फळच नाही तर मुळापासून फुलापर्यंत अख्खं 'केळीचं झाड' गुणकारी

Anirudha Sankpal

नैसर्गिक औषध

केळ हे केवळ एक चविष्ट फळ नसून ऊर्जा, पोषण आणि अनेक रोगांपासून संरक्षण देणारे एक नैसर्गिक औषध आहे.

पोषक घटक

केळ्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर आणि व्हिटॅमिन B6 भरपूर प्रमाणात असते, जे हृदय आणि पचनासाठी फायदेशीर ठरते.

पचन संस्था

पिकलेले केळ नैसर्गिक रेचक म्हणून काम करते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होऊन आतड्यांचे आरोग्य सुधारते.

Banana | pinterest

केळीचे पान

केळीच्या पानावर जेवल्यामुळे अन्नाचे पचन सुलभ होते आणि शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होण्यास मदत होते.

सूज आणि जखम

केळ्याच्या मुळाचा लेप लावल्यास दुखापत आणि सूज कमी होते; यात सूजविरोधी 'फायटोस्टेरॉल्स' असतात.

किडनी स्टोन

केळ्याच्या खोडाचा रस नियमित घेतल्यास त्यातील 'पोटॅशियम सायट्रेट'मुळे मूत्राशयातील खडा विरघळण्यास मदत होते.

त्वचेचे विकार

केळीच्या पानांची राख आणि हळद यांचा लेप लावल्यास फंगल इन्फेक्शन किंवा त्वचेच्या इतर समस्यांवर आराम मिळतो.

नसांची कमजोरी

केळीच्या फुलांचा एरंडेल तेलात केलेला लेप नसांची कमजोरी, मुंग्या येणे आणि जळजळ कमी करण्यासाठी गुणकारी ठरतो.

सर्वसमावेशक उपयोग

आयुर्वेद आणि आधुनिक शास्त्रानुसार केळीचे फळ, फूल, पान आणि खोड हे सर्व भाग मानवी आरोग्यासाठी अत्यंत पोषक आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

येथे क्लिक करा