पुढारी वृत्तसेवा
केळी खाऊन साल फेकून देताय? थांबा! साल फेकून देण्यापूर्वी तिचे हे ७ भन्नाट उपयोग नक्की जाणून घ्या!
चमकदार आणि पांढरे शुभ्र दात
केळीच्या सालीचा आतील भाग दातांवर हलके घासल्यास दातांचा पिवळेपणा दूर होतो आणि ते मोत्यासारखे पांढरे शुभ्र चमकतात
चेहऱ्यावर येईल नैसर्गिक ग्लो
सालीतील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला पोषण देतात, ज्यामुळे मुरुम आणि सुरकुत्या कमी होऊन चेहरा नेहमी तजेलदार दिसतो
झाडांसाठी उत्कृष्ट सेंद्रिय खत
केळीच्या सालीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते. ती बारीक चिरून मातीत मिसळल्यास घरगुती झाडांची उत्तम वाढ होते
डास चावल्यास खाज आणि सुजेवर आराम
डास किंवा एखादा कीटक चावलेल्या जागेवर केळीची साल हलके चोळल्यास खाज आणि सूज क्षणार्धात कमी होते
लेदर शूज आणि बॅग चमकवा
लेदरचे जुने बूट किंवा बॅग केळीच्या सालीने घासून स्वच्छ कापडाने पुसून घ्या, त्या अगदी नव्यासारख्या चमकू लागतील
कोरड्या त्वचेसाठी नॅचरल मॉइश्चरायझर
सालीचा आतील भाग चेहऱ्यावर काही वेळ घासल्याने त्वचा खोलवर हायड्रेट होते आणि त्वचेचा कोरडेपणा निघून जातो
जलद कंपोस्ट खत निर्मिती
केळीची साल खूप लवकर कुजते. त्यामुळे ती कंपोस्ट खतात किंवा ओल्या कचऱ्यात टाकल्याने दर्जेदार सेंद्रिय खत लवकर तयार होते!