पुढारी वृत्तसेवा
पचनक्रिया सुधारते
केळीच्या पानातील नैसर्गिक एन्झाइम्स अन्नात मिसळून पचनास मदत करतात.
अन्न अधिक चविष्ट लागते
गरम अन्न केळीच्या पानावर वाढल्यास त्याचा सुगंध आणि चव वाढते.
आरोग्यासाठी सुरक्षित व नैसर्गिक
प्लास्टिक किंवा थर्माकोलपेक्षा केळीचं पान पूर्णपणे नैसर्गिक आणि केमिकलमुक्त आहे.
अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म
केळीच्या पानात जंतुनाशक गुण असतात, जे संसर्गाचा धोका कमी करतात.
इम्युनिटी वाढण्यास मदत
पानातील पोषक घटक शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
पर्यावरणपूरक पर्याय
डिस्पोजेबल प्लेट्सऐवजी केळीचं पान वापरल्यास प्रदूषण कमी होतं.
आयुर्वेदात महत्त्व
आयुर्वेदानुसार केळीच्या पानात जेवण केल्याने वात-पित्त दोष संतुलित राहतात.
उष्णतेपासून अन्नाचे संरक्षण
गरम अन्न थेट पानावर वाढल्याने अन्नातील पोषक घटक टिकून राहतात.
सांस्कृतिक आणि पारंपरिक महत्त्व
भारतीय परंपरेत शुभ कार्यात केळीच्या पानात जेवण शुभ मानले जाते.