Bali Starling : या पक्ष्याला काळ्या बाजारात लाखो रुपयांना विकले जाते

Namdev Gharal

या पक्ष्याचे सौंदर्य प्रत्‍येकाला मोहवून टाकते, बर्फासारखी पांढरी शुभ्र पिसे व डोळ्याजवळचा निळे पट्टा अतिशय मनमोहक असतो.

याचे पखं अतिशय मुलायम आणि चमकदार असतात की पाहणाऱ्याला याची भूरळ पडते Bali Starling असे या पक्ष्याचे नाव असून आपल्‍याकडे याला बाली मैना म्‍हणतात

हा अतिशय दुर्लभ पक्षी असून याच्या सौंदर्यामुळे याला मागणी असते त्‍यामुळे काळ्या बाजारात लाखो रुपये किंमत मिळते

बाली स्टारलिंग आवाज काढण्यात आणि इतरांची नक्कल करण्यात पटाईत असतात. त्‍याच्या मधुर आवाजासाठीही ओळखला जातो.

बाली स्टारलिंग हा पक्षी फक्त इंडोनेशियातील बाली बेटावर आढळतो. विशेषतः पश्चिम बाली राष्ट्रीय उद्यानात याचा वावर आहे.

त्याची चोच तपकिरी आणि पिवळ्या रंगाची असते. डोळे आणि पायांभोवतीची त्वचा निळ्या रंगाची असते, जी त्याला एक खास लुक देते.

हा पक्षी सर्वभक्षी असतात, म्हणजेच ते फळे, फुले, धान्य, छोटे कीटक, पतंग इत्यादी खातात.

अनेकजण हौस म्‍हणून या सुदंर पक्ष्याला पाळतात पण दुर्लभ असल्‍याने याची मोठ्या प्रमाणात तस्‍करी होते

बाली स्टारलिंग हा एक अत्यंत संकटग्रस्त पक्षी आहे. त्यांची संख्या खूपच कमी झाली आहे

याच्या संवर्धनासाठी इंडोनेशियाने प्रयत्‍न सुरु केले आहेत. ज्यात प्रजनन कार्यक्रम आणि नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण यांचा समावेश आहे.

Blue Footed Booby