Balasaheb Thackeray Smruti Udyan : श्रद्धा आणि स्मृतींचे स्थान, बाळासाहेब ठाकरे स्मृतिउद्यान लोकसेवेत

अंजली राऊत

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृतिउद्यान २१ डिसेंबर 2025 पासून लोकांच्या सेवेत खुले झाले आहे

आशिया खंडातील सर्वात मोठा Adventure Park आता नाशिकमध्ये

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी गंगापूर रोडवरील पंपिंग स्टेशन येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्वातील विविध पैलू उलगडणारे हे स्मृती उद्यान आहे

या उद्यानाचा लोकार्पण सोहळा दि. 28, सप्टेंबर 2024 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

नाशिकच्या कलावंतांसाठी अद्यावत कलादालन या स्मृतीकेंद्राचे एक प्रमुख आकर्षण आहे. या माध्यमातून स्थानिक युवा चित्रकार, व्यंगचित्रकार, शिल्पकार यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाच्या ध्वनीफिती, चित्रफिती, मुलाखती यांचा ठेवा, त्यांची रोखठोक पत्रकारिता, दांडगे वाचन, टोकदार लिखाण यांची प्रचिती देणारे जगातील सुप्रसिध्द लेखकांची सुप्रसिध्द पुस्तकांचा ठेवा असणारे ईव्ही रूम व वाचनालयाच्या धाटणीवर तसेच सध्याच्या काळाला अनुसरुन ई-वाचनालयाची निर्मिती करण्यात आली आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान | pudhari news network
Nashik News : बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचे आज लोकार्पण