Anirudha Sankpal
वाईट स्वप्नांचा परिणाम
वाईट किंवा भीतीदायक स्वप्ने पडणे ही केवळ मानसिक घटना नसून त्यामुळे शरीरात ताणतणावाची (stress response) प्रतिक्रिया निर्माण होते.
तणाव निर्माण करणारे हार्मोन्स
झोपेत असतानाही वाईट स्वप्नामुळे मेंदूला धोका जाणवल्यास एड्रेनालाईन आणि कॉर्टिसॉल यांसारखे ताणतणाव निर्माण करणारे हॉर्मोन्स झपाट्याने रिलीज होतात.
ग्लुकोज बाहेर पडते
एड्रेनालाईन निर्माण झाल्यामुळं लिव्हर शरीरातील साठवून ठेवलेले ग्लुकोज वेगाने बाहेर सोडते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
कॉर्टिसॉलमुळे परिस्थिती चिघळते
वाईट स्वप्न पाहताना रिलीज झालेल्या कॉर्टिसॉलमुळे पेशींची इन्सुलिनप्रती संवेदनशीलता तात्पुरती कमी होते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे नियंत्रण अवघड होऊन जाते.
रक्तातील साखरेची उलथापालथ
ज्या व्यक्ती सतत ग्लुकोज मॉनिटर (CGM) वापरतात, त्यांना अशा प्रकारच्या स्वप्नांमुळे होणारी रक्तातील साखरेची उलथापालथ सहज लक्षात येते.
कोणासाठी परिणाम तीव्र
मधुमेह किंवा प्रि-डायबेटिस असलेल्या लोकांमध्ये शरीराची इन्सुलिन क्षमता कमकुवत असल्यामुळे हा परिणाम अधिक तीव्र आणि दीर्घकाळ टिकणारा असतो.
म्हणून सकाळची शुगर वाढलेली दिसते
वारंवार रात्री कॉर्टिसॉलची पातळी वाढल्यामुळे सकाळी उठताना साखरेची पातळी (fasting glucose) वाढलेली दिसू शकते.
तर वैद्यकीय सल्ला घ्या
अधूनमधून होणारे हे बदल सामान्य असले तरी, जर वारंवार रात्री साखरेचे प्रमाण वाढत असेल तर त्यावर वैद्यकीय जाणकारांची मदत घेणे गरजेचे असते.