Asit Banage
गुडघेदुखी ही आजच्या जीवनशैलीत मोठ्या प्रमाणात आढळणारी समस्या आहे.
गुडघ्यांच्या आरोग्यासाठी सध्या ‘बॅकवर्ड वॉकिंग’ म्हणजेच उलट्या दिशेने चालण्याचा ट्रेंड चर्चेत आहे.
मागे चालल्याने गुडघ्याच्या सांध्यावर पडणाऱ्या दाबाची पद्धत बदलते.
त्यामुळे गुडघ्याच्या पुढील भागावर पडणारा भार काही प्रमाणात कमी होण्यास मदत होऊ शकते.
उलट चालण्यामुळे गुडघ्याची स्थिरता आणि संतुलन सुधारण्यास मदत होऊ शकते.
सामान्य चालताना कमी वापरले जाणारे काही स्नायू मागे चालताना सक्रिय होतात.
ऑस्टियोअर्थरायटिस किंवा गुडघ्याच्या पुढील भागाशी संबंधित समस्यांमध्ये हा व्यायाम काही लोकांना अस्वस्थता व वेदना कमी करण्यास मदत करू शकतो.
मात्र उलट चालताना पडण्याचा धोका असल्याने सुरक्षित आणि सपाट जागेवर, आवश्यक असल्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हा व्यायाम करणे योग्य ठरते.