जॅकलिन फर्नांडिसचे 'दम दम' हे नवीन गाणे रिलीज झाले आहे, त्यानंतर ती चर्चेत आहे. .जॅकलिनने इंस्टाग्रामवर तिच्या गाण्यातील काही फोटो शेअर केले आहेत. तिने हा आवडता सीन असल्याचे सांगितले..इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये जॅकलीन पारंपरिक भारतीय नृत्यवेषात दिसत आहे. .एम्बेलिश्ड ब्लाउज आणि ऑरेंज रंगाची धोती स्कर्ट असा तिचा पोशाख अत्यंत लक्षवेधी आहे.गोल्डन शाइनी फॅब्रिकचा ब्लाउज वेगवेगळ्या दागिन्यांनी सजवण्यात आला आहे..ब्लाउजचा गळा अत्यंत सुंदर लटकनांनी सजवले आहे. पांढऱ्या मोत्यांमध्ये मखमली मेहरून रंगाचे स्टोन्स वापरून सौंदर्य अजूनच खुलवले आहे..ब्लाउजप्रमाणेच धोती स्कर्टही विशेष लक्षवेधी आहे. ऑरेंज रंगाच्या सिल्क फॅब्रिकमध्ये पुढील बाजूस प्लीट्स आहेत आणि मागच्या बाजूला धोती स्टाईल. .जॅकलीनने सुंदर कमरबंद परिधान केला आहे. यावरही चोळीप्रमाणेच स्टोन वर्क असून, त्यामुळे तिचा लूक अधिक राजेशाही वाटतोय..तिच्या संपूर्ण लूकमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधलं ते म्हणजे गजऱ्यांनी सजलेले केस..जॅकलीनने पारंपरिक दागिने परिधान करून तिच्या सौंदर्यात चारचांद लावले..संपूर्ण पारंपरिक लूक पाहून सोशल मीडियावर चाहते भरभरून कौतुक करत आहेत..पुरुषांना सुडौल महिला का आवडतात ?