पुढारी वृत्तसेवा
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत देशातील गरीब कुटुंबांना ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत आरोग्य विमा कवच पुरवले जाते.
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत मार्च २०२५ पर्यंत एकूण ९.१९ कोटी उपचार झाले आहेत. जाणून घ्या 'आयुष्मान कार्ड' ऑनलाइन कसे बनवावे.
सर्वप्रथम Ayushman Bharat Beneficiary Portal (beneficiary.nha.gov.in) किंवा PM-JAY ची मुख्य साइट/ॲप उघडा आणि 'Beneficiary' या पर्यायावर क्लिक करा.
'Am I Eligible'/Beneficiary पर्याय निवडा. तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा भरून ओटीपीद्वारे सत्यापित (Verify) करा.
यानंतर तुमचे राज्य आणि जिल्हा निवडा. त्यानंतर आधार नंबरद्वारे तुमच्या कार्डसाठीची पात्रता तपासा. आयुष्मान कार्डसाठी अर्ज करताना आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा पुरावा आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.
यानंतर सर्च मोडमध्ये Aadhaar/Ration Card/Mobile number किंवा अन्य योग्य पर्याय निवडून शोधा. सिस्टम SECC-2011 डेटाबेसशी जुळणारे तपशील दर्शवेल.
केवायसी पूर्ण करा: कुटुंबातील सदस्य निवडून 'Click here to Enrol'/eKYC हा पर्याय निवडा. आधार-ओटीपी किंवा इतर पडताळणी पद्धत वापरून eKYC/Aadhaar Authentication पूर्ण करा.
कार्ड डाउनलोड करा: यशस्वी पडताळणीनंतर तुम्हाला डिजिटल/PVC कार्ड डाउनलोड किंवा प्राप्त करता येईल.