Eye Dark Circle: गाईचे तूप, काळे मनुके अन् रक्तचंदन.. डार्क सर्कल्स घालवण्याचे भन्नाट उपाय

Anirudha Sankpal

वाढत्या स्क्रीनटाइममुळे डोळ्यांची निस्तेजता, कोरडेपणा आणि डार्क सर्कल्सच्या समस्या वाढत आहेत, त्यामुळे डोळ्यांची योग्य निगा राखणे आवश्यक आहे.

डोळ्यांच्या मसाजसाठी गाईचे तूप वापरावे आणि डोळ्यांना थंडावा देण्यासाठी गुलाबपाणी किंवा काकडीचे काप डोळ्यांवर ठेवावेत.

दररोज डोळ्यांचे व्यायाम आणि रविवारी 'चक्षु स्तोत्र' पठण केल्याने दृष्टीस फायदा होतो, तसेच 'त्राटक' क्रियेमुळे एकाग्रता आणि दृष्टी सुधारते.

डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी कुमकुमादी शतधौत घृतने मालिश करणे, काळ्या मनुका खाणे आणि रक्तचंदन लेपाचा वापर करणे फायदेशीर ठरते.

नेत्र तर्पण चिकित्सा ही दृष्टीतील धूसरपणा (Blurr vision), चष्म्याचा वाढता नंबर आणि डोळ्यांवरील ताण (Eye strain) कमी करण्यासाठी उत्तम उपचार आहे.

मोबाईलचा अतिवापर टाळून डोळ्यांना नियमित विश्रांती द्यावी, ज्यामुळे चष्म्याचा नंबर वाढण्यापासून प्रतिबंध करता येतो.

सतत स्क्रीनसमोर काम करणाऱ्यांनी महिन्यातून एकदा तज्ज्ञांच्या सल्ल्याने नेत्र उपचार करून घेणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी हिताचे असते.

डोळे हे महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय असल्याने कोणत्याही गंभीर त्रासाकडे दुर्लक्ष न करता नियमित तपासणी आणि घरगुती उपाय यांचा समतोल राखावा.

येथे क्लिक करा