Anirudha Sankpal
आयुर्वेदामध्ये दूध हा संपूर्ण आहार मानला गेला असला तरी काही गोष्टींसोबत त्याचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
प्रसिद्ध आयुर्वेदिक चिकित्सक डॉ. रॉबिन शर्मा यांच्या मते, दुधासोबत विरुद्ध आहार घेतल्यास पाचक तंत्र बिघडते आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
दूध पिताना किंवा दुधाचे सेवन करताना मीठ आणि नमकयुक्त पदार्थांचे सेवन करणे पूर्णपणे टाळावे.
संत्रा, मौसमी, लिंबू यांसारखे अंबट फळे दुधासोबत खाल्ल्याने पोटात जडपणा, ॲसिडिटी आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो.
अनेक जण आवडीने पितात त्या बनाना शेक म्हणजेच केळी आणि दुधाच्या संयोगाने देखील पोटात ब्लोटिंग आणि अपचन होऊ शकते.
मासे आणि दूध यांचे गुणधर्म पूर्णपणे विरुद्ध असल्याने, यांच्या एकत्र सेवनामुळे त्वचेसंबंधित समस्या उद्भवू शकतात.
याशिवाय दही, खमीरयुक्त पदार्थ, कलिंगड, खरबूज आणि मुळा यांसारख्या गोष्टी देखील दुधासोबत घेणे टाळले पाहिजे.
या चुकीच्या फूड कॉम्बिनेशन्समुळे पचनक्रियेवर वाईट परिणाम होऊन काही लोकांमध्ये त्वचा विकार व इतर आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.