आंबा खाताय? मग या गोष्टींसोबत खाण्याची चूक अजिबात करू नका; तज्ज्ञांचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

आंबा खाताना ही चूक करू नका!

उन्हाळ्यात सगळ्यांचा आवडता आंबा आरोग्यासाठी फायदेशीर असला तरी काही पदार्थांसोबत खाल्ल्यास तो नुकसानही करू शकतो.

Mango | Pudhari

आंब्यात असतात भरपूर पोषक घटक

आंब्यात व्हिटॅमिन C, फायबर, नैसर्गिक साखर आणि ऊर्जा देणारे घटक मोठ्या प्रमाणात असतात.

Mango | Pudhari

आंब्यासोबत आंबट फळं टाळा

आंब्यासोबत संत्री, मोसंबी किंवा इतर आंबट फळं खाल्ल्यास पोटाचा त्रास होऊ शकतो.

Mango | Pudhari

आंबा आणि दूध चांगलं नसतं

आयुर्वेदानुसार आंबा लवकर पचतो, पण दूध हळू पचतं. त्यामुळे पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो.

Mango | Pudhari

मँगो शेकमुळे वाढू शकतो पित्तदोष

आंबा आणि दूध एकत्र घेतल्याने काही लोकांमध्ये अॅसिडिटी, जळजळ आणि पित्त वाढण्याची शक्यता असते.

Mango | Pudhari

आंबा आणि दहीचं कॉम्बिनेशन धोकादायक?

दह्यातील लॅक्टिक अॅसिड आणि आंब्यातील नैसर्गिक साखर यामुळे पोटात फर्मेंटेशन वाढू शकतं.

Mango | Pudhari

गॅस आणि ब्लोटिंगचा त्रास

आंबा-दही एकत्र खाल्ल्यास गॅस, पोट फुगणे आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो.

Mango | Pudhari

तळलेले पदार्थ

भजी, तळलेले पदार्थ किंवा जंक फूड खाल्ल्यानंतर आंबा खाल्ल्यास शरीरातील उष्णता वाढू शकते.

Mango | Pudhari

राजमा-छोले आणि आंबा टाळा

हेवी प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ल्यानंतर आंबा खाल्ल्यास पचनावर अतिरिक्त ताण येतो.

Mango | Pudhari

आंबा खा, पण...

आंबा मर्यादित प्रमाणात आणि योग्य पदार्थांसोबत खाल्ल्यासच त्याचे पूर्ण फायदे मिळू शकतात.

Mango | Pudhari

महाराष्ट्रात किती भाषा बोलल्या जातात? तुम्हाला माहितेय का? आकडा वाचून थक्क व्हाल

Maharashtra Languages | Pudhari
येथे क्लिक करा