Srinagar Flowers : काश्‍मीरमधील शेवंती उद्यान पर्यटकांसाठी खुले

पुढारी वृत्तसेवा

आशिया खंडातील सर्वात मोठे शेवंतीचे उद्यान 'बाग-ए-गुल-ए-दाऊद' पर्यटकांसाठी खुले झाले आहे.

जम्‍मू काश्‍मीरचे मुख्‍यमंत्री ओमर अब्‍दुलांच्‍या हस्‍ते उद्यानाचे उद्‍घाटन झाले.

इंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप गार्डनच्या धर्तीवर काश्मीरला वर्षभर फुलणारा नंदनवन बनवण्याचा यामागील  उद्‍देश आहे.

काश्मीरमध्ये फुले केवळ उन्हाळ्यातच फुलतात या पारंपारिक धारणेला आव्हान देण्याचा हा प्रयत्न आहे.

या बागेत १ लाखाहून अधिक शेवंतीची रोपे ५० हून अधिक प्रकारच्या विविध रंगांत बहरली आहेत.

देशी आणि विदेशी जातींच्या शेवंतीची फुले पर्यटकांना भुरळ घालत आहेत.

यंदाच्या हंगामात उद्यानाला २० ते ३० लाख पर्यटक भेट देतील अशी अपेक्षा आहे.

यंदाच्या हंगामात शेवंती उद्यानामुळे राज्‍य सरकारला सुमारे ५०० कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता आहे.

येथे क्‍लिक करा.