Aeroponic Farming |चिनमध्ये केली जाते हवेत उगवणाऱ्या बटाट्यांची शेती

Namdev Gharal

चिनमध्ये सध्या एक फार्मिगची पद्धत खूप विकसीत होत आहे. यामुळे आता कोणताही भाजीपाला उगवण्यासाठी मातीची गरजच पडणार नाही

या शेतीतंत्राचे नाव आहे ॲरोफोनिक फार्मिंग याचे वैशिष्ट्य म्हणजे मातीशिवाय पिके उगवतात येतात.

या तंत्रज्ञानाचा उगम अमेरिकेत झाला. आता याचा वापर बटाटे उत्‍पादनासाठी चिनमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो

पुर्वी चिनमध्येही पारंपरिक पद्धतीने बटाट्यांचे उत्पादन हवामान आणि जमिनीवर अवलंबून होते.

पण वाढती गरज लक्षात घेता चीनने एरोपोनिक पद्धतीने बटाट्यांची निर्मिती सुरू केली.

या तंत्राने मातीशिवाय बटाट्यांच्या मुळांना धुक्याच्या स्वरूपात पोषक द्रव पुरवला जातो.

एका वर्षात पारंपरिक शेतीपेक्षा ३ ते ५ पट जास्त बटाटे तयार होतात.

ही पिके रोगांना कमी बळी पडतात कारण मातीतील बुरशी व बॅक्टेरियाचा संपर्क होत नाही.

या शेतीमध्ये एकाच ठिकाणी उभ्या रचनेत (vertical setup) हजारो झाडे उगवता येतात. पाणी व जागेची बचत होते

चीनच्या युनान (Yunnan) आणि इनर मंगोलिया (Inner Mongolia) भागात अशा एरोफोनिक फार्म्स मोठ्या प्रमाणावर आहेत.

FAO (Food and Agriculture Organization) च्या अहवालानुसार, चीन एरोपोनिक बटाटा शेतीत जगात आघाडीवर आहे.

भारत, सिंगापूर, इस्रायल, आणि जपान या देशांमध्येही आता एरोपोनिक प्रकल्प सुरू आहेत.

झाडांच्या मुळ्या हवेतील (air suspension) असतात आणि त्यावर पोषक द्रवाचे सूक्ष्म फवारणीद्वारे (mist spray) पोषण दिले जाते.