Ashadi Ekadashi | आषाढी एकादशीचा उपवास सोडण्यासाठी ‘वाघाटा’चीच भाजी का खातात?

Namdev Gharal

एकादशीचा उपवास सोडताना वाघाटाची (वाघाटीची) भाजी खाण्यामागे धार्मिक परंपरेसोबतच ऋतुमान आणि आयुर्वेदातील वैज्ञानिक कारणे दडलेली आहेत.

वाघाटी ज्याला काही भागांत वाघाट, वाघेटी, गोविंदफळ किंवा व्याघ्रनखी म्हणतात. ही महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या रांगांमध्ये, कोकणात आणि मावळ भागात आढळणारी एक दुर्मिळ रानभाजी आहे.

विशेषतः आषाढी एकादशीचा उपवास सोडण्यासाठी द्वादशीला या रानफळाची भाजी खाण्याची विशेष धार्मिक आणि आरोग्यदायी परंपरा आहे.

काही ठिकाणी आषाढी एकादशीच्या निमित्ताने किंवा वारीच्या काळात ही वनस्पती आणि फळे विठ्ठलाला अर्पण करण्याची परंपरा आहे.

हे फळ आकाराने छोट्या हिरव्या पेरूसारखे किंवा मध्यम लिंबू/करटुल्यासारखे गोल दिसते. याच्या वेलीला वाघाच्या नखांसारखे वळलेले छोटे काटे असतात, म्हणून याला शास्त्रीय भाषेत 'व्याघ्रनखी' म्हणतात.

याची चव कोवळी फळे किंचित उग्र आणि तुरट-कडू असतात, त्यामुळे ती थेट न खाता त्याची व्यवस्थित फोडणी देऊन भाजी केली जाते. फळ पिकल्यावर लाल होते.

वाघाटी पावसाळ्याच्या सुरुवातीला उगवते. आषाढी एकादशी आणि द्वादशी नेमकी याच काळात येते. त्‍यामुळे निसर्गाने या ऋतूत दिलेली ताजी रानभाजी शरीराला मिळावी म्हणून या दिवशी वाघाट खाण्याची परंपरा पडली असावी

एकादशीच्या दिवशी दिवसभर कडक उपवास केल्यामुळे किंवा साबुदाणा, वेफर्स, बटाटा यांसारखे पदार्थ खाल्ल्यामुळे पोटात पित्त, गॅस आणि अपचनाचा त्रास होण्याची शक्यता असते.

वाघाटामध्ये विशेष पाचक आणि वातशामक गुणधर्म असतात. यामुळे उपवास सोडताना ही भाजी खाल्ल्याने पोटातील पित्त शांत होते आणि मंदावलेली पचनक्रिया पुन्हा वेगाने सुरू होते.

कडक उपवासानंतर शरीराला अचानक ताकद आणि पोषणाची गरज असते. वाघाट हे एक बलवर्धक आणि शक्तिवर्धक रानफळ आहे. ज्यामुळे उपवासाचा थकवा त्वरित दूर होतो.

एकादशीला भगर किंवा वरई का खातात,