Namdev Gharal
उपवासाच्या दिवशी किंवा एकादशीला भगर म्हणजेच 'वरई', 'वरीचे तांदूळ' खाण्याची परंपरा भारतात फार जुनी आहे. ही केवळ धार्मिक परंपरा नसून यामागे उत्तम आयुर्वेदिक आणि वैज्ञानिक शास्त्र आहे.
भगर उपवासाला का खातात यामागचे काय असते शास्त्र हे पाहू , तसेच तिचे पोषणमुल्य व शरीरासाठी किती फायदेशीर असते हे पाहू
उपवासादिवशी अधान्य खाण्याचा नियम आहे, गहू, तांदुळ, ज्वारी, बाजरी यासारखी धान्य खावू नयेत अशी परंपरा आहे. त्यामुळे धान्य नसलेले भगर वरी खाल्ली जाते
भगर हे कुठल्याही तृणधान्यापासून येत नाही, तर ते एका गवताचे बी आहे. त्यामुळे त्याला 'अधान्य' मानले जाते आणि ते उपवासासाठी पूर्णपणे ग्राह्य आहे.
उपवास करताना शरीराला विश्रांतीची गरज असते. नेहमीचे जड अन्न खाण्याऐवजी भगर खाल्ल्याने पचनसंस्थेवर ताण येत नाही, कारण भगर पचायला खूप हलकी असते.
जुन्या काळात भगर ही नैसर्गिकरीत्या रानावनांत उगवायची आणि त्यावर कोणतीही रासायनिक प्रक्रिया केली जात नसे. त्यामुळे ती शुद्ध आणि सात्विक मानली जाते.
याचे फायदे काय आहेत ते पाहू - भगरीमध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असतात. हे शरीरात हळूहळू पचतात, ज्यामुळे उपवासाच्या दिवशी रक्तातील साखरेची पातळी एकदम वाढत नाही आणि दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहते.
भगरीमध्ये भरपूर प्रमाणात डाएटरी फायबर (Dietary Fiber) असते. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही.
भगर निसर्गातच पूर्णपणे ग्लुटेन-फ्री असते. ज्यांना गव्हाची किंवा ग्लुटेनची ॲलर्जी आहे, त्यांच्यासाठी भगर हा एक उत्तम पर्याय आहे.
भगरीचा स्वभाव कोरडा असतो. त्यामुळे ती बनवताना त्यात थोडे तूप, जिरे किंवा शेंगदाण्याचा कूट वापरल्यास ती अधिक पौष्टिक बनते आणि शरीरातील उष्णता नियंत्रित राहण्यास मदत होते.