आषाढ तळावा, श्रावण भाजावा अन् भाद्रपद उकडावा! या म्हणीमागचं आरोग्याचं गुपित काय?

पुढारी वृत्तसेवा

आरोग्याचे सूत्र

ही जुनी मराठी म्हण केवळ खाद्यसंस्कृती नसून पावसाळ्यातील आरोग्याचे एक शास्त्र आहे.

Rain and health benefits

आषाढ तळावा

आषाढात पाऊस आणि हवेत गारवा जास्त असतो, अशा वेळी शरीरात उष्णता टिकवण्यासाठी तळलेले पदार्थ खावेत.

ऊर्जेचा स्रोत

तळलेल्या पदार्थांमुळे आषाढातील ओलावा आणि थंडीत शरीराला आवश्यक ऊर्जा आणि स्निग्धता मिळते.

श्रावण भाजावा

श्रावणात पचनशक्ती (जठराग्नी) मंदावते, म्हणून पचायला हलके असे भाजलेले पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो.

पचनास सुलभ

धान्य किंवा भाज्या भाजून घेतल्याने त्यातील आर्द्रता कमी होते आणि त्या पोटाला जड पडत नाहीत.

भाद्रपद उकडावा

भाद्रपदात हवेतील आर्द्रता आणि 'ऑक्टोबर हीट'सारखा उकाडा वाढल्याने पित्ताचा त्रास होऊ शकतो.

पित्त शमन

उकडलेले पदार्थ पचायला सर्वात हलके आणि थंड असतात, जे या ऋतूतील उष्णतेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात.

ऋतुचर्या पालन

आपल्या पूर्वजांनी ऋतूंनुसार सांगितलेले हे आहाराचे नियम पाळल्यास आपण पावसाळ्यातील आजारांपासून दूर राहू शकतो.

येथे क्लिक करा...