10 Exercises Fitness Test: तुम्ही खरंच फिट आहे की फक्त तसं दिसता? हे १० व्यायाम सांगतील सत्य

Anirudha Sankpal

नुसते फिट दिसून, पिळदार शरीरयष्टी असून उपयोग नाही, ते फुगलेले स्नायू खरंच उपयोगात येतात का हे टेस्ट करण्याचे १० व्यायाम पुढील प्रमाणे

gym timing | pudhari photo

१

जर तुम्ही ६ मिनिटात एक मैल धावू शकला तर तर तुमचा स्टॅमिना चांगला आहे असं मानलं जाईल.

Experts Advice On Running After 40 | Pinterest

२

जर तुम्ही एका दमात २५ योग्य प्रकारे पुश अप्स मारले तर तुमचे हाताचे आणि छातीचे स्नायू बळकट आहेत.

Push Ups Heart Health | pudhari

३

१० पुल अप्स जर तुम्ही मारू शकला तर तुमचा बायसेप्स कोअर आणि संपूर्ण हाताचे स्नायू शक्तीशाली आहेत.

४

भिंतीला जर तुम्ही बसलेल्या अवस्थेत ६० सेकंद थांबू शकता तर तुमच्या पायात चांगलं बळ आहे.

५

प्लँक म्हणजेच पोटाचे स्नायू किती बळकट आहेत हे सांगाणारा व्यायाम. ६० सेकंद टिकला तर तुम्ही फिट

६

जर तुम्ही एका दमात ४० बॉडीवेट स्क्वाट्स मारू शकला तर तुमचे पाय मजबूत आहेत.

७

पायाचे अंगठे १० सेकंद धरून ठेवणे हे तुमची फ्लेक्सिबिलिटी किती आहे हे सांगतात.

८

तुमची ग्रीप कशी आहे त्यात ताकद आहे का नाही खांदे मजबूत आहेत का नाही हे ठरवण्यासाठी तुम्ही ४५ ते ६० सेकंद डेड हँग करा

९

जर तुम्ही १० हजार स्टेप्स चालत असाल आणि तुमच्यामध्ये अजूनही एनर्जी शिल्लक असेल तर हे एक चांगल्या फिटनेसचं लक्षण आहे.

walking | Canva

१०

जर तुम्ही न थांबता २० बर्पीस चा एक सेट केला तर तुमचा फिटनेस चांगला असल्याचे ते संकेत आहेत.

येथे क्लिक करा