Metabolism : मानवी चयापचयाला मर्यादा आहे का? नवीन संशोधन काय सांगते?
पुढारी वृत्तसेवा
चयापचय (Metabolism) म्हणजे शरीरात अन्नापासून ऊर्जा तयार होण्याची आणि ती ऊर्जा वापरण्याची प्रक्रिया.
'करंट बायोलॉजी' मध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासामध्ये असे दिसून आले आहे की, अल्ट्रामॅरेथॉनपटूंनाही चयापचयाचा उच्च दर जास्त काळ टिकवून ठेवता येत नाही.
'अल्ट्रा-एन्ड्युरन्स ॲथलीट्स अँड द मेटाबॉलिक सीलिंग' संशोधनाने मानवी चयापचय क्षमतेच्या शारीरिक मर्यादेचे अस्तित्व स्पष्ट केले आहे.
अभ्यासात स्पष्ट झाले की, अत्यंत दमछाकीच्या शर्यतींदरम्यान खेळाडू ११,००० कॅलरी पर्यंत ऊर्जा खर्च करू शकतात; परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात ऊर्जा खर्च करणे दीर्घकाळासाठी शरीराला अशक्य आहे.
संशोधनातील निष्कर्षानुसार, अगदी सर्वात उच्च श्रेणीतील खेळाडूही दीर्घकाळ उच्च ऊर्जा उत्पादन टिकवून ठेवू शकत नाहीत.
संशोधनात असे आढळले आहे की, सुमारे ३० आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीत मानवी शरीर मेटाबॉलिक रेटच्या केवळ २.४ पट ऊर्जा वापरच टिकवून ठेवू शकते.
बीएमआर म्हणजे जिवंत राहण्यासारख्या मूलभूत कार्यांसाठी दररोज आवश्यक असलेली किमान ऊर्जा. संशोधनात आढळले की, तीव्र शारीरिक हालचाली करणार्यांचे बीएमआरच्या १० पट ऊर्जा वापरू शकतात; परंतु शरीर ते दीर्घकाळ टिकवून ठेवू शकत नाही.
यापूर्वी संशोधकांनी दीर्घकालीन चयापचय मर्यादा सुमारे २.५ पट बीएमआर असू शकते असे सुचवले होते, परंतु संशोधक अँड्र्यू बेस्ट यांच्या मते, याची स्पष्टपणे चाचणी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
या अभ्यासाने मानवी शरीरातील 'चयापचय मर्यादा'अधोरेखित केली असून, शरीर दीर्घकाळ परिश्रम कायम ठेवू शकत नसल्याचे स्पष्ट केले आहे.
हे संशोधन मानवी शरीर किती ऊर्जा प्रक्रिया करू शकते, हे समजून घेण्याच्या एक पाऊल मानले जात आहे.
येथे क्लिक करा.