स्वालिया न. शिकलगार
अपुर्वाने तिचा पती तनुज गोवळकरसाठी खूपच खास पोस्ट लिहिलीय. तिने इन्स्टा पोस्टमध्ये म्हटलंय-
'आज बरोबर एक वर्षापूर्वी, मी तुला पहिल्यांदा पाहिले, एका क्षणात माझे संपूर्ण जगच बदलून गेले'
'त्याच क्षणी मला समजले की, माझ्या हृदयाला त्याचे हक्काचे घर सापडले आहे...'
'एक पूर्ण वर्ष इतक्या वेगाने निघून गेले, यावर विश्वासच बसत नाही...'
'मैत्रीपासून सुरू झालेली ही गोष्ट...आता तुझी पत्नी म्हणून तुझ्या सोबतीने उभे राहणे'
'अवघ्या ३६५ दिवसांत तू माझा आधार, माझा शांतता देणारा सोबती बनलास'
'तू तोच जीवनसाथी आहेस ज्यासाठी मी नेहमी प्रार्थना केली होती, तनुज'
'तुझ्यासोबत हात हातात घालून आयुष्य घालवण्यासाठी मी खूप उत्सुक आहे'