स्वालिया न. शिकलगार
अभिनेत्री अनुष्का सरकटे व निखिल चव्हाण यांच्या मेहंदी सोहळ्यातील खास क्षण समोर आले आहेत
अभिनेत्री अनुष्का सरकटेच्या घरी लवकरच सनई-चौघडे वाजणार आहेत
अभिनेता निखिल चव्हाणसोबत ती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे
नुकतेच तिच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत
मी स्वप्न पाहतेय का? अशी कॅप्शन लिहित तिने मेहंदीचे फोटो शेअर केले आहेत
तिने निळ्या रंगाचा घागरा, डिझायनर ब्लाऊज, दागिने असा लूक केला
फुलांनी सुंदर सजावट केलेल्या सोहळ्यातील तिचे खूप सुंदर क्षण पाहायला मिळताहेत
तिचा आणखी एक भावूक क्षण म्हणजे ती एका फोटोत वडिलांसोबत दिसतेय