Anushka Pimputkar : मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...; अभिनेत्री अनुष्काच्या जांभळ्या नऊवारीतील अदा

पुढारी वृत्तसेवा

अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरने नुकतंच एक मनमोहक फोटोशूट केलं आहे.

यात तिने नेसलेल्या जांभळ्या रंगाच्या डिझायनर नऊवारी साडीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या नऊवारी साडीवर अनुष्काने स्लीव्हवर आणि गळ्याभोवती सुंदर आरी वर्क केलेला ब्लाऊज परिधान केला आहे.

या मराठमोळ्या लूकवर अनुष्काने गळ्यात भरजरी हार, नाकात नथ आणि साजेसे कानातले घालून पारंपरिक दागिन्यांचा साज केला आहे.

गळ्यात भरजरी कुंदन हार, ज्यात लाल स्टोनसची सजावट आहे. कानात छोटे कुंदन झुमके. हातात बांगड्या व अंगठी. हे सगळे दागिने तिच्या लुकला एक शाही थाट देतात.

अनुष्काने फोटोला 'जपुन होतं ठेवलं मन हे कधीच न्हाइ झुरलं..' अस कॅप्शन दिले आहे.

तिने तिच्या इन्स्टाग्रामवर दोन व्हिडिओ शेअर केले आहेत, त्याला 'मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज' असं कॅप्शन दिले आहे.

अनुष्काचा स्मितहास्ययुक्त लुक, तिच्या डोळ्यातली चमक आणि एकूण आत्मविश्वासातून तिच्या सौंदर्याची खरी झलक दिसते.

अनुष्का छोट्या पडद्यावर सक्रिय आहे. सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील 'लग्नानंतर होईलच प्रेम' या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.

अनुष्काचा 'अल्याड पल्याड' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. आता तिच्या या नव्या फोटोशूटची चर्चा सुरू आहे.

समंथाने सांगितलं तिच्या फिटनेसच रहस्य; 'हा' आहे तिचा साधा-सोपा डाएट प्लॅन!