स्वालिया न. शिकलगार
साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री अनुपमा परमेश्वरनने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे
ती Cyber Crime ची शिकार झाली असून तिने म्हटले आहे की, पोस्ट करणाऱ्याने तिचे फेक अकाऊंट्स बनवले होते
त्यावर केवळ द्वेष पसरवणे आणि कंटेंटवर चुकीचे कॉमेंट केलं जात होतं
त्यामुळे अनुपमाने सायबर क्राईम ब्रँचमध्य तक्रार दाखल केली
तिने इन्स्टा पोस्टमध्ये लिहिलं- 'एक अकाऊंट परिवार, सह-कलाकार, मित्रांना टॅग करून माझ्याविषयी चुकीची माहिती देत आहे'
'मॉर्फ्ड फोटो, आरोप पाहून Online Harassment होत असल्याचे समोर आले आहे'
तिने खुलासा केला की, केरळमध्ये साइबर क्राईम पोलिसांत तक्रारीनंतर तपास लागला
ती २० वर्षीय मुलगी आरोपी आहे. तिच्या वयामुळे तिची ओळख बाहेर येऊ दिली नाही''