Anjeer Vegetarian or Non Vegetarian : अंजीर शाकाहारी की मांसाहारी, संभ्रम दूर करा; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

Asit Banage

अंजीर शाकाहारी की मांसाहारी? या प्रश्नावर सोशल मीडियावर अनेक दावे केले जात आहेत.

अंजीराच्या काही प्रजातींमध्ये परागीभवनासाठी विशिष्ट प्रकारच्या गांधीलमाशीची मदत घेतली जाते.

काही प्रकरणांत परागीभवनाच्या प्रक्रियेदरम्यान मादी गांधीलमाशी अंजीराच्या आत अडकून मरू शकते.

अंजीराच्या दुधात आढळणारे फायसिन हे प्रथिनांचे विघटन करणारे एन्झाइम आहे.

अंजीराच्या सर्व प्रजातींमध्ये गांधीलमाशीची मदत आवश्यक असतेच असे नाही.

व्यावसायिक अंजीरांच्या काही जाती परागीभवनाशिवायही फळधारणा करतात.

अंजीर खाण्याबाबत वैज्ञानिक माहिती आणि धार्मिक किंवा वैयक्तिक आहारविषयक श्रद्धा यांमध्ये फरक असू शकतो.

अंजीर मांसाहारी असल्याचा सरसकट दावा करण्याऐवजी त्याची जात आणि परागीभवनाची पद्धत समजून घेणे महत्त्वाचे आहे.

आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...