अनिरुद्ध की काव्या मारन? कोण आहे सर्वाधिक श्रीमंत? संपत्तीचा आकडा पाहून व्हाल थक्क!

पुढारी वृत्तसेवा

अनिरुद्ध-काव्याच्या लग्नाची चर्चा

अनिरुद्ध रविचंदर आणि काव्या मारन यांच्या लग्नाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. दोघांपैकी सर्वाधिक श्रीमंत कोण, याचीही चाहत्यांना उत्सुकता आहे.

काव्या मारन कोण आहे?

काव्या मारन ही सनरायझर्स हैदराबाद या आयपीएल संघाची मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. क्रिकेटविश्वात ती तिच्या कामामुळे आणि लोकप्रियतेमुळे चर्चेत असते.

काव्याचे शिक्षण किती?

काव्याने चेन्नईतील स्टेला मॅरिस महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली आहे. तिने लंडनमधील वॉरविक बिझनेस स्कूलमधून एमबीएचे शिक्षणही पूर्ण केले आहे.

अनिरुद्ध रविचंदर कोण आहे?

अनिरुद्ध हा दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार आहे. त्याने २०१२ मध्ये ‘व्हाय धिस कोलावेरी डी’ या गाण्यामुळे मोठी लोकप्रियता मिळवली.

बॉलिवूडमध्येही मोठी लोकप्रियता

‘पेट्टा’ आणि शाहरुख खानच्या ‘जवान’सारख्या चित्रपटांसाठी अनिरुद्धने संगीत दिले आहे. त्याच्या संगीताला देशभरातील चाहत्यांची पसंती मिळते.

अनिरुद्धची संपत्ती किती?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनिरुद्धची एकूण संपत्ती सुमारे ५० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. एका चित्रपटासाठी संगीत देण्याचे त्याचे मानधन ८ ते १० कोटी रुपये असल्याचेही म्हटले जाते.

काव्याची संपत्ती किती?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, काव्या मारनची संपत्ती ४०० ते ४३५ कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे. मात्र, तिच्या वैयक्तिक संपत्तीची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही.

लग्नाच्या चर्चेला पुन्हा उधाण

दोघे लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा दक्षिण भारतीय माध्यमांमध्ये सुरू आहेत. मात्र, त्यांच्या लग्नाबाबत दोघांकडूनही अधिकृत घोषणा झालेली नाही.

चाहत्यांना अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

लग्नाच्या चर्चांमुळे अनिरुद्ध आणि काव्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आता या चर्चांवर दोघे काय प्रतिक्रिया देतात, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

इम्रान खानच नव्हे, बॉलिवूडचे ‘हे’ स्टार्सही आहेत परदेशी नागरिक

येथे क्लिक करा