अविनाश सुतार
केवळ मानव जातीलाच हसता येते, असे नाही प्रत्यक्ष जीवनात अनेक प्राणी “हसतात” हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे
काही प्राण्यांचे हसणे तर आश्चर्यकारकरीत्या माणसांच्या हसण्यास, खसखसण्यास किंवा खिदळण्याशी मिळतेजुळते असते
संशोधनानुसार असे हसणे मैत्रीपूर्ण भावना व्यक्त करते, तणाव कमी करते आणि समूहातील सामाजिक नाती अधिक घट्ट करते
चिंपांझी खेळताना, एकमेकांना गुदगुल्या करताना किंवा मस्ती करताना, श्वास घेताना फुसफुसणारे आवाज काढतात, जे मानवी हसण्यास मिळतेजुळते असतात
शांत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या बोनोबो या प्राण्यांमध्ये खेळादरम्यान सौम्य खिदळणे आणि उंच पट्टीचे हसू ऐकायला मिळते
गोरिला झटापट, पाठलाग किंवा खेळताना लयबद्ध, धापा टाकल्यासारखे आवाज काढतात. हे त्यांचे हसणे मजा आणि आनंद दर्शवते कळपातील सुसंवाद टिकविण्यासाठी मदत करते
डॉल्फिन कर्कश आवाज, शिट्ट्या आणि खेळकर ध्वनी काढतात. संशोधक या आवाजांना हसण्यासारखे मानतात, यातून बुद्धिमत्ता, भावनिक, सामाजिक जीवन दर्शवतात
न्यूझीलंडमधील किया पोपट बुद्धिमान पक्षी असून त्याचा एक खास खेळकर आवाज असतो, जो मानवी हसण्यासारखा वाटतो, ते चोच आणि पायांचा वापर हातांसारखा करतात
उंदीर उंच पट्टीचे, मानवी कानांना न ऐकू येणारे अल्ट्रासोनिक आवाज काढतात, विशेष उपकरणांशिवाय हे आवाज माणसांना ऐकू येत नाहीत, पण संशोधक त्यांना हसण्याचाच एक प्रकार मानतात