श्रावणाची रिमझिम, अंगावर पडणारे पावसाचे टपोरे थेंब आणि पाण्याचा शांत प्रवाह... अशा मनमोहक वातावरणात अभिनेत्री अनघा अतुलचं फोटोशूट.अनघाने या फोटोशूटसाठी अत्यंत सुरेख आणि साधा लूक निवडला आहे. ऑफ-व्हाइट रंगाची नाजूक साडी आणि त्यावर उठून दिसणारा लाल रंगाचा ब्लाऊज... .या फोटोशूटचं खरं आकर्षण आहे ते म्हणजे निसर्गरम्य लोकेशन. .खळखळ वाहणारं पाणी, हिरवागार निसर्ग आणि पावसाच्या सरी झेलत अनघाने हे फोटो काढले आहेत. .तिने दिलेल्या प्रत्येक पोझमध्ये एक सहजता आणि आत्मविश्वास दिसतो. .तिची प्रत्येक अदा थेट काळजाला भिडते. अनघाने दिलेल्या नैसर्गिक आणि मनमोहक पोझमुळे फोटो अधिक जिवंत वाटतात..या फोटोंच्या व्हिडिओला तिने 'परदेसिया' हे गाणं पार्श्वभूमीला लावलं आहे..या फोटोंना तिने दिलेली कॅप्शन तर आणखीनच खास आहे. ती लिहिते, ‘खूबसूरत मैं नही, तुम्हारी निगाहें है’. .रंग माझा वेगळा या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेली अनघा अतुल या फोटोशूटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. .तिच पावसामुळे अधिकच खुललेलं सौंदर्य चाहत्यांची मनं जिंकत आहे..साऊथची क्वीन! साई पल्लवीचे खास १० लुक्स