Amla Benefits | आवळा की आवळा सरबत शरीरासाठी काय अधिक फायदेशीर?

पुढारी वृत्तसेवा

कच्चा आवळा व्हिटॅमिन-C चा सर्वात मोठा स्रोत

कच्च्या आवळ्यात नैसर्गिक व्हिटॅमिन-C सर्वाधिक असते, जे सरबत बनवल्यावर कमी होऊ शकते.

Amla Moringa Shots | Canva

आवळा खाल्ल्याने अँटिऑक्सिडंट क्षमता जास्त मिळते

कच्च्या आवळ्यातील अँटिऑक्सिडंट्स शरीरात सूज कमी करतात आणि त्वचा–केसांना फायदा करतात.

Amla Moringa Shots | Canva

सरबतमध्ये साखर किंवा प्रिझर्वेटिव्ह वाढू शकतात

बाजारात मिळणाऱ्या आवळा सरबतामध्ये साखर-सोडियम जास्त असते, ज्यामुळे आरोग्याला तोटा होऊ शकतो.

Amla

घरचे आवळा सरबतही पौष्टिक, पण प्रक्रियेमुळे पोषकतत्त्वे कमी

उकळणे, गाळणे या प्रक्रियेमुळे व्हिटॅमिन-C चा काही भाग नष्ट होतो.

Amla

आवळ्यात फायबर मुबलक पचन सुधारते

कच्च्या आवळ्यात फायबर सरबतापेक्षा जास्त असते, त्यामुळे पचन सुधारते व बद्धकोष्ठता कमी होते.

Amla Moringa Shots | Canva

सरबत शरीराला हायड्रेशन देते

उन्हाळ्यात पिण्यासाठी आवळा सरबत उत्तम शरीरात पाण्याची कमतरता भरून काढते.

Amla Moringa Shots | Canva

वजन कमी करण्यासाठी कच्चा आवळा अधिक उपयुक्त

कच्चा आवळा मेटाबॉलिझम वाढवतो; सरबतामध्ये अतिरिक्त साखर असल्यास फायदा कमी होतो.

Canva photo

डायबिटीज रुग्णांसाठी कच्चा आवळा सुरक्षित

सरबतातील साखर डायबिटीजसाठी हानिकारक; कच्चा आवळा उत्तम पर्याय.

Amla Moringa Shots | Canva

कच्चा आवळा अधिक फायदेशीर

दोन्ही फायदेशीर असले तरी कच्चा आवळा पौष्टिकदृष्ट्या सरबतापेक्षा जास्त लाभ मिळवून देतो

Canva photo
<strong>येथे क्लिक करा</strong>