Anirudha Sankpal
एका महिला भक्ताने प्रेमानंद महाराजांना विचारले की, मृत्यूनंतर कुटुंबातील व्यक्तींशी असलेले संबंध कायम राहतात का?
जाणून घेऊयात विराट कोहलीचे आध्यात्मिक मार्गदर्शक प्रेमानंद महाराज काय म्हणतात
मृत्यू ही गाढ झोपेपेक्षाही अधिक विस्मरणाची (विसरून जाण्याची) अवस्था आहे.
ज्याप्रमाणे गाढ झोपेत कोणतीही स्मृती शिल्लक राहत नाही, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर पूर्वीच्या जन्मातील सर्व स्मृती आणि ओळख पूर्णपणे संपून जाते.
आईच्या पोटात नऊ महिने राहूनही आपल्याला त्या क्षणाची एक सेकंदही आठवण राहत नाही, त्याचप्रमाणे मृत्यू ही त्याहून अधिक गाढ अवस्था आहे.
कुटुंबाचे नाते, पत्नी-पुत्र, संपत्ती, बँक बॅलन्स किंवा पद-प्रतिष्ठा यांसारख्या कोणत्याही सांसारिक मोहाशी आत्म्याचा संबंध राहत नाही.
आत्मा केवळ आपल्या कर्माचा प्रभाव घेऊन पुढच्या प्रवासाला निघतो.
जीवनातील सर्व नातेसंबंध शरीर आणि सभोवतालच्या परिस्थितीवर आधारित असतात.
शरीर संपताच या सर्व नात्यांचे बंधनही त्याच क्षणी समाप्त होते; पुढील प्रवास फक्त आत्म्याचा असतो.