शोलेचा गब्बर सिंग आठवला की डोळ्यांसमोर येतात ते अमजद खान.गब्बर सिंगच्या भूमिकेसाठी आधी प्रेमनाथ यांचा विचार झाला होता.पण प्रेमनाथ यांनी नकार दिला. मग, डॅनी यांना गब्बर सिंगची भूमिका देण्यात आली .पण, त्यांनी फिरोज खानचा धर्मात्मा आधीच साईन केला होता .मग सलीम खान यांनी रमेश सिप्पींना नव्या कलाकाराचा विचार करायला सांगितलं .सलीम यांनी जावेद अख्तरना अमजद हा गब्बरच्या भूमिकेत फिट बसेल असं सांगितलं .जावेद यांनी दिल्ली युथ फेस्टिव्हलमध्ये अमजद यांचे ‘ए मेरे वतन के लोगों’ नाटक पाहिलं होतं .सलीम हे अमजदला घेऊन रमेश सिप्पींच्या खार मधील ऑफिसमध्ये गेले .गब्बर गेटअपमध्ये तयार केलं, एक दात काळा केला .ऑफिसच्याच कॉरिडॉरमध्ये अमजद यांची स्क्रीन टेस्ट घेतली .लगेच रमेश सिप्पींनी अमजद यांना 'शोले'साठी साईन केलं . 'सुंदरा' मधून येतेय गौतमी पाटील; निक शिंदेचा नवा अल्बम