Anand Jain: अंबानींचा सगळ्यात जवळचा मानला जाणारा व्यक्ती कोण?

Vishal Bajirao Ubale

तिसरा मुलगा

धीरुभाई अंबानींना मुकेश आणि अनिल हे दोनच मुलं. पण आनंद जैन यांना घरात ‘तिसरा मुलगा’ मानलं जायचं. मुकेश अंबानी आणि आनंद जैन यांची मैत्री शाळेपासूनची आहे.

Anand Jain Story | Pudhari

मित्रासाठी सगळं सोडलं

१९८१ मध्ये मुकेश अंबानी भारतात परतले. तेव्हा आनंद जैन दिल्लीत स्वतःचा व्यवसाय करत होते. एका फोनवर त्यांनी सगळं सोडलं आणि मुंबईत आले.

Anand Jain Story | Pudhari

रिलायन्सला वाचवणारी व्यक्ती

८०च्या दशकात रिलायन्स अडचणीत होती. शेअर बाजारातून मोठा दबाव होता. त्या वेळी आनंद जैन यांनी योग्य रणनीती वापरली.

Anand Jain Story | Pudhari

काम केलं, पण पगार घेतला नाही

आनंद जैन रिलायन्समध्ये मोठ्या पदावर होते. रिलायन्स कॅपिटल आणि IPCL मध्ये त्यांनी काम केलं. जवळपास २५ वर्षे त्यांनी पगार घेतला नाही.

Anand Jain Story | Pudhari

वादातही विश्वास कायम

मुकेश आणि अनिल अंबानी यांच्यात वाद झाला. तेव्हा आनंद जैन चर्चेत आले. तरीही मुकेश अंबानींचा त्यांच्यावर विश्वास कायमच राहिला.

Anand Jain Story | Pudhari

स्वतःचा उद्योग, मुलाचं Dream11

आज आनंद जैन Jai Corp चे अध्यक्ष आहेत. त्यांचा मुलगा हर्ष जैन Dream11 चा संस्थापक आहे. Dream11 भारतातील पहिला गेमिंग युनिकॉर्न आहे.

Anand Jain Story | Pudhari

२०२५ मध्येही जवळीक

आजही आनंद जैन अंबानी कुटुंबाच्या जवळ आहेत. त्यांचं घर अँटिलियाजवळ आहे. त्यांचे अंबानी कुटुंबासोबतचे फोटोज सतत व्हायरल होत असतात.

Anand Jain Story | Pudhari
Wildlife Friendly Highway: जीव वाचवणारा..भारतातला पहिलाच आगळावेगळा हायवे