अंजली राऊत
अंबानी कुटुंब साधे शाकाहारी जेवण पसंत करते. त्यांच्या अँटिलिया बंगल्यात कुटुंबासह 600 हून अधिक कर्मचाऱ्यांसाठी रोज सुमारे 4,000 चपात्या बनवल्या जात असून कर्मचाऱ्यांना कटुंबाप्रमाणे त्यांना देखील पौष्टिक अन्न दिले जाते
अंबानी कुटुंबाला हॉटेलमधील किंवा खूप तेलकट पदार्थांपेक्षा घरगुती, सात्विक आणि पौष्टिक अन्न खायला आवडते. त्यांच्या घरात प्रत्येक पदार्थाची शुद्धता आणि गुणवत्ता जपली जाते. रोजच्या जेवणात साधे डाळ, भात, वेगवेगळ्या भाज्या, चपाती आणि सॅलडचा समावेश असतो.
अंबानी कुटुंब हे रात्री हलके आणि पचायला सोपे असे जेवण खातात. नाचणी किंवा बाजरीची भाकरी, गुजराती स्टाईलच्या भाज्या आणि सॅलड खाणं पसंत करतात.
अंबानींच्या कुटुंबात बनणाऱ्या चपात्या फक्त कुटुंबासाठी नसून अँटिलियामध्ये आठवड्याचे 7 दिवस 24 तास काम करणाऱ्या 600 हून अधिक कर्मचाऱ्यांसाठी देखील बनवल्या जातात. कर्मचाऱ्यांना देखील सात्विक, पौष्टीक अन्न दिले जाते
अंबानी कुटुंबाच्या मते त्यांच्यासाठी काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्ती हा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच एक महत्वपूर्ण घटक आहे. त्यामुळे त्याला देखील गरम, स्वादिष्ट आणि पौष्टिक जेवण मिळावे.
इतक्या मोठ्या संख्येने आणि उत्कृष्ट गुणवत्तेच्या चपाती बनवण्यासाठी विशेष व्यवस्था ठेवण्यात आली आहे. अंबानींच्या स्वयंपाकघरात एक स्वयंचलित रोटी मेकर मशीन बसवलेले आहे. हे मशीन काही मिनिटांत शेकडो चपात्या तयार करू शकते, ज्यामुळे वेळ आणि श्रम यांची बचत होते.
त्यांच्याकडे चपातीसाठी मशीन असले तरी त्यांची चव आणि दर्जा उत्कृष्ट राखण्यासाठी एक खास शेफ आणि त्यांची टीम आहे. या कुशल चपातीसाठी शेफचा महिन्याचा पगार सुमारे दोन लाख आहे. त्यासोबतच इतर सुविधाही दिल्या जातात.
हा मोठा पगार फक्त कामासाठी नाही, तर त्या शेफच्या व्यावसायिकतेसाठी आहे. तो प्रत्येक चपातीचा आकार, जाडी आणि चव एकसारखी ठेवतो. जेवणाच्या गुणवत्तेशी तडजोड नसते. मुकेश अंबानींच्या घरी केवळ संपत्ती नाही, तर कामगार आणि त्यांच्या कौशल्याचा आदर, सामाजिक जबाबदारी जपली जाते.