Climate change : अमेझॉन जंगलात झाडांचा आकार वाढतोय! जाणून घ्या नवीन अभ्यास...
पुढारी वृत्तसेवा
अमेझॉन वर्षावन हे जगातील सर्वात मोठे उष्णकटिबंधीय वर्षावन असून ते दक्षिण अमेरिकेतील नऊ देशांमध्ये पसरलेले आहे.
शास्त्रज्ञांनी अमेझॉन वर्षावनाला "पृथ्वीचे फुफ्फुस" म्हटले आहे कारण ते CO2 शोषून घेण्यात आणि ऑक्सिजन तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
आता वातावरणातील कार्बन डायऑक्साइडच्या वाढत्या पातळीमुळे अमेझॉन रेनफॉरेस्टमधील झाडांचा सरासरी आकार सातत्याने वाढत असल्याचे एका नवीन अभ्यासात म्हटले आहे.
दर दहा वर्षांनी झाडांचा आकार तीन टक्क्यांहून अधिक वाढत असल्याचा अभ्यास "नेचर प्लांट्स" जर्नलमध्ये प्रकाशित झाला.
दक्षिण अमेरिका आणि ब्रिटनमधील ६० हून अधिक विद्यापीठांमधील सुमारे १०० शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय पथकाने हा अभ्यास केला.
शास्त्रज्ञांनी दीर्घकालीन डेटासेट तयार करण्यासाठी सरासरी १२,००० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या १८८ कायमस्वरूपी वन भूखंडांमधील झाडांचे निरीक्षण केले.
संशोधकांना असे आढळून आले की, दर दशकात काही झाडांचा व्यास सरासरी ३.३ टक्क्यांनी वाढला आहे.
शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, वातावरणात जास्त CO2 प्रकाशसंश्लेषणाचा दर वाढवतो, यामुळे काही वनस्पतींमध्ये वाढ होते.
नवीन संशोधनातील निष्कर्ष महत्त्वाचे आहेत कारण आकाराने मोठी झालेली झाडे गतकाळापेक्षा जास्त "कार्बन शोषक" ठरत आहेत.
येथे क्लिक करा.