Amazing World Facts : जगापेक्षा ७ वर्षांनी मागे! १३ महिन्यांचे वर्ष असलेला देश कोणता?

पुढारी वृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या एका महत्त्वाच्या परदेश दौऱ्यावर आहेत. या चार दिवसांच्या दौऱ्यात ते जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान या देशांना भेट देणार आहेत.

पंतप्रधान आज इथिओपियाला दौरा असताना हा आफ्रिकन देश नेमका इतका खास का आहे आणि खरंच येथील घड्याळे जगापेक्षा वेगळी आहेत म्हणजेच 'सात वर्षे मागे' आहे. याविषयी जाणून घेवूया...

इ.स.पूर्व ९८०मध्ये स्थापित झालेला इथिओपिया हा आफ्रिकेतील सर्वात जुना स्वतंत्र देश मानला जातो. जग गुलामगिरी आणि वसाहतवादाच्या खाईत होते, तेव्हा हा देश अभिमानाने स्वतंत्र उभा होता.

युरोपातील कोणत्याही शक्तीने या एकमेव आफ्रिकन राष्ट्रावर कधीही कब्जा केला नाही. याची लोकसंख्‍या सुमारे १३ कोटी २१ लाख (२०२४) असून, इथिओपिया हा नायजेरियानंतर आफ्रिकेतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे.

उत्तर-पूर्व आफ्रिकेत स्थित असलेल्या या देशाला 'उत्पत्तीची मोहक भूमी' असेही म्हटले जाते. येथे खडकात कोरलेली प्राचीन चर्च, उंच पठारे, वाळवंट आणि ज्वालामुखींचे वैविध्यपूर्ण भूदृश्य पाहायला मिळते.

इथिओपियाची सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्याचे कॅलेंडर. हा देश आजच्या जगापेक्षा तब्बल सात वर्षांनी मागे आहे.

हा देश जगापेक्षा तब्‍बल सात वर्षांनी मागे आहे कारण असे की, इ.स.पूर्व ५२५मध्ये रोमन चर्चने आपल्या जुन्या कॅलेंडरमध्ये बदल केले; पण इथिओपियाने आपले प्राचीन कॅलेंडर न बदलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ते आजही ग्रेगोरियन कॅलेंडरपेक्षा मागे आहेत.

इथिओपियातील वर्षात १३ महिने असतात, ही आणखी एक रंजक गोष्ट आहे. यापैकी १२ महिने ३० दिवसांचे असतात आणि १३वा महिना हा सामान्य वर्षात ५ दिवसांचा, तर लीप वर्षात १३ वा महिना ६ दिवसांचा असतो.

याच कारणामुळे इथिओपियामध्ये ११ सप्टेंबर, २००७ रोजी नवीन वर्ष साजरे झाले होते. तसेच, आपण २५ डिसेंबरला ख्रिसमस साजरा करतो, तर इथिओपियन लोक ७ जानेवारीला ख्रिसमस साजरा करतात.

येथे क्‍लिक करा.