Namdev Gharal
बाजारात अगदी सहज उपलब्ध होणारे सोया चंक्स सर्वांसाठी प्रोटिनचा एक उत्तम स्त्रोत मानला जातो. विषेशता शाकाहारी लोकांसाठी उपयुक्त ठरते
प्रथिनांचा (Protein) उत्तम स्त्रोत : १०० ग्रॅम सोया चंक्समधून जवळपास ५२ ग्रॅम प्रोटीन मिळते, जे स्नायूंची (Muscles) मजबुती आणि त्यांची निर्मिती करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत : यामध्ये फायबर आणि प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्याने सोया चंक्स खाल्ल्यानंतर पोट दीर्घकाळ भरलेले राहते.
सोया चंक्स खाल्ल्यानंतर वारंवार भूक लागत नाही आणि वजन कमी करण्यास किंवा ते नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
सोया चंक्समध्ये 'आयसोफ्लाव्होन्स' हे घटक असतात, जे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यास आणि चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) वाढवण्यास मदत करतात.
तसेच सोया चंक्समुळे रक्तदाब नियंत्रणात राहून हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते. मांसाहारासारखा कोल्स्ट्रॉल वाढण्याचा धोका कमी असतो
सोया चंक्समध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते, ज्यामुळे पचन संस्था सुलभतेने कार्य करते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.
सोया चंक्समध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि कॉपर यांसारखी खनिजे आढळतात. ही खनिजे हाडे मजबूत ठेवण्यासाठी आणि ऑस्टिओपोरोसिससारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरतात.
महिलांमध्ये मेनोपॉजच्या (रजोनिवृत्ती) काळात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे शारीरिक त्रास होतो. सोया चंक्समधील फायटोस्ट्रोजेन्स (Phytoestrogens) हे हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत करतात.