Chicken 65 Name History : ‘चिकन 65‘ हे नाव का पडले? 65 या आकड्याचा काय आहे इतिहास

Namdev Gharal

मांसाहार प्रेमींमध्ये एक पदार्थ नेहमी फेवरीट असतो तो म्हणजे चिकन 65, कुरकुरीत कोटींगने तळलेलेल्या चिकनच्या या डीशला ‘चिकन65’ असे नाव का पडले हे माहिती आहे का

अनेकांचा ऑल-टाइम फेव्हरेट स्टार्टर म्हणजे 'चिकन 65'! पण तुम्हाला याचा इतिहास माहीत आहे का? जाणून घेऊया नावापाठीमागील काही रंजक गोष्टी

चेन्नई कनेक्शन : या डिशची सुरुवात १९६५ मध्ये चेन्नई (मद्रास) मधील प्रसिद्ध 'बुहारी हॉटेल' (Buhari Hotel) मध्ये झाली होती. मूळची दक्षिण भारतीय असलेली ही डिश आज जगभरात आवडीने खाल्ली जाते

नाव '65' का पडले? : यापाठीमागे अनेक कथा आहेत. सर्वात प्रसिद्ध कथेनुसार, १९६५ मध्ये बुहारी हॉटेलच्या मेन्यू कार्डवर हा पदार्थ ६५ व्या क्रमांकावर होता, म्हणून याचे नाव 'चिकन 65' पडले.

६५ मसाल्यांची अफवा? : काही लोकांच्या मते, हा पदार्थ बनवताना ६५ प्रकारच्या मिरच्या किंवा मसाले वापरले जायचे. पण ही केवळ एक अफवा आहे!

काही लोकांच्या मते सैनिकांसाठी बनवताना चिकनचे ६५ तुकडे केले जायचे, किंवा हे ६५ दिवस जुन्या कोंबडीचे मांस असायचे, अशाही काही रंजक कथा सांगितल्या जातात.

आणखी एक गोष्ट म्हणजे याच बुहारी हॉटेलने चिकन 65 च्या यशानंतर चिकन 78, चिकन 82 आणि चिकन 90 हे पदार्थ देखील बाजारात आणले होते!

कुरकुरीत आणि चमचमीत : दही, लसूण, कढीपत्ता आणि लाल तिखट यांच्या मॅरिनेशनमुळे हे चिकन वरून कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ (Juicy) लागते.

मॅरिनेट केलेले चिकन तेलात कडक तळून घेतले जाते, ज्यामुळे त्याला लालभडक रंग आणि कुरकुरीतपणा येतो. पण आपल्या चवीमुळे ’चिकन 65’ हा पदार्थ मात्र भारतीयांमध्ये खूपच लोकप्रिय ठरला आहे.