पुढारी वृत्तसेवा
मिलेट्स म्हणजे काय?
नाचणी, बाजरी, ज्वारी, कांगणी यांसारख्या धान्यांना मिलेट्स किंवा ‘श्री अन्न’ म्हणतात.
वजन नियंत्रणात मदत
मिलेट्समध्ये फायबर जास्त असल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि ओव्हरईटिंग कमी होते.
पचनासाठी फायदेशीर
उन्हाळ्यात होणारी अपचन, गॅस आणि जडपणा कमी करण्यास मिलेट्स मदत करतात.
शरीराला ऊर्जा मिळते
मिलेट्समध्ये कॉम्प्लेक्स कार्ब्स असल्यामुळे दिवसभर एनर्जी टिकून राहते.
हाडे मजबूत होतात
कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि आयर्नमुळे हाडांचे आरोग्य सुधारते.
शरीर थंड ठेवण्यास मदत
काही मिलेट्स शरीराला नैसर्गिक थंडावा देण्यास मदत करतात.
डायबिटीजमध्ये उपयुक्त
मिलेट्सचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
कसे खावे?
भाकरी, खिचडी, उपमा, डोसा किंवा आंबील स्वरूपात मिलेट्स खाऊ शकता.
योग्य प्रमाण महत्त्वाचे
संतुलित आहाराचा भाग म्हणून मर्यादित प्रमाणात मिलेट्स सेवन करणे फायदेशीर ठरते.