पुढारी वृत्तसेवा
घामाला स्वतःला वास नसतो. त्वचेवरील बॅक्टेरिया घामातील घटकांचे विघटन करतात, त्यामुळे दुर्गंधी निर्माण होते.
फिटकरी (Alum) ही पारंपरिक घरगुती गोष्ट असून तिच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात.
फिटकरी थोडीशी ओली करून अंडरआर्म्सवर हलक्या हाताने चोळा आणि काही मिनिटांनी तसेच राहू द्या.
फिटकरी त्वचेवरील काही बॅक्टेरियांची वाढ कमी करण्यास मदत करू शकते, त्यामुळे घामाची दुर्गंधी कमी होऊ शकते.
दररोज अंडरआर्म्स स्वच्छ धुणे आणि कोरडे ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे.
कॉटनचे आणि हवेशीर कपडे घातल्यास घाम कमी साचतो आणि दुर्गंधीचा त्रासही कमी होऊ शकतो.
शरीर हायड्रेट ठेवल्यास शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते.
अतितिखट पदार्थ, लसूण, कांदा आणि कॅफिनयुक्त पेयांचे जास्त सेवन काही लोकांमध्ये शरीराच्या वासावर परिणाम करू शकते.
फिटकरी वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा. त्वचेला जळजळ किंवा त्रास झाल्यास वापर थांबवा.